नाम तुझे घेता देवा
नाम तुझे घेता देवा दुख माझे दूर जाई
तूच संभाली मजला तूच असे माझी आई !!ध्रु !!
आठवता नाम तुझे संकटही सारे पळे
संशयास स्थान नसे मर्म त्याचे कोणा कळे
शोधु कुठे कुठे तुज सर्व तुच सर्वाठाई !!१!!
जाऊ नये श्वास व्यर्थ नामविन गजानन
चित्त अंतरंगी वळे मंञ राहो मनोमन
तुझ्या चरणाची सेवा मज जन्मोजन्मी देई!!2!!
मन बुध्दी चित्त देह झाले तुझ्यात विलिन
हद्य़ात भेद न राहो अहंकार नमविन
चमत्कार निर्भिड ते उपदेश देत राही !!३!!
नाम तुझे घेता देवा
कवि :- निलेश वासुदेव गणगे
मोब :- ९४०३२५२५२६