Monday, 7 September 2009

प्रेमाच्या सावलीत

कुणीतरी कसेतरी सांगावे हे मला,
प्रेमाच्या सावलीत शोधु कुठे तिला?!!ध्!!

मंद अशा वा-यात स्पर्श तिचा नाही,
संथ अशा पाण्यात लाट का ग नाही?
किलबिल ती पक्षांची गगनात असे
हुरहुर तिच्या भेटीची मनात असे
कुठेतरी आणि कधीतरी भेटेल का ती मला?
प्रेमाच्या सावलीत शोधु कुठे तिला? !!1!!

स्वप्न असे जागेपणी मला पडतात,
दुराव्याचे पक्षी असे मिठीत दिसतात,
सौदर्याची राणी झालेली दिसे,
हुरहुर तिच्या भेटीची मनात असे.
आतातरी आणि मगतरी भेटेल का ती मला?
प्रेमाच्या सावलीत शोधु कुठे तिला?!!2!!

कवि : निल कवी

No comments:

Post a Comment