तुझ्या दर्शनाचे
तुझ्या दर्शनाचे लागले रे वेड
किती विनाऊ तुला मी ,दर्शन दे !!ध्रु!!
गजर तुझ्या नामाचा ,ह्रुदयीच्या भावे
जे जे लागते ते ते मागोनिया घ्यावे
तुझ्या सेवेची नित्य,मज संधि दे !!१!!
मूर्ति तुझी देवा ,तुझ्या मंदिरात
आठवते ती मज, नित्य अंतरात
नयनात मूर्ति सदैव , राहू दे !!2!!
आरतीस मनाचा हार आणला मी
प्रसादास चित्त प्रमोदे ,अर्पिला मी
चुकले असेल कही ,त्याची माफ़ी दे !!३!!
गीतकार :- निलेश वासुदेव गणगे (नील कवि )
मोब :- ९४०३२५२५२६
No comments:
Post a Comment