Thursday, 2 April 2009

कोणत्या शब्दात सांगू मी?

शब्द माझे,मी शब्दांचा
शब्दांवाचुन अधुरा मी
शब्दांनीच अधूरेपन माझे,
कोणत्या शब्दात सांगू मी?

शब्दात गंध ,गंधात रंग
रंगात रंगून जातो मी
शब्दगंधाने मंत्रमुग्ध होतो
कोणत्या शब्दात सांगू मी?

निसर्गात शब्द ,शब्दात निसर्ग
निसर्गात हरवून जातो मी
निसर्गातील गाराव्याचा स्पर्श
कोणत्या शब्दात सांगू मी?

देवात शब्द ,शब्दात देव
अस्तित्व त्याचे पाहतो मी
अस्तित्व देवाचे ह्या शब्दातील
कोणत्या शब्दात सांगू मी?

शब्द मधुरा ,शब्द नशा
नशेत बेभान होतो मी
शब्द गंधाचे गुन ,नशेत गातो
कोणत्या शब्दात सांगू मी?

कवि :- निलेश वासुदेव गणगे (नील कवि)
मोब:- ९४०३२५२५२६

No comments:

Post a Comment