Monday, 7 September 2009
प्रेमाच्या सावलीत
प्रेमाच्या सावलीत शोधु कुठे तिला?!!ध्!!
मंद अशा वा-यात स्पर्श तिचा नाही,
संथ अशा पाण्यात लाट का ग नाही?
किलबिल ती पक्षांची गगनात असे
हुरहुर तिच्या भेटीची मनात असे
कुठेतरी आणि कधीतरी भेटेल का ती मला?
प्रेमाच्या सावलीत शोधु कुठे तिला? !!1!!
स्वप्न असे जागेपणी मला पडतात,
दुराव्याचे पक्षी असे मिठीत दिसतात,
सौदर्याची राणी झालेली दिसे,
हुरहुर तिच्या भेटीची मनात असे.
आतातरी आणि मगतरी भेटेल का ती मला?
प्रेमाच्या सावलीत शोधु कुठे तिला?!!2!!
कवि : निल कवी
Saturday, 18 July 2009
मी काय देऊ तुला?
तु बोल ना तु सांग ना अग बोल ना
मी काय देऊ तुला? ध्रु
आकाशातील चंद्र तारे देऊ का ग तुला
की स्वप्नातील सैर करण्या घेऊन जाऊ तुला १
सागराच्या लाटांवरती नाव तुझे कोरले
त्या लाटांनी मजला येऊन शिल्पे मोती दिले
ते शिल्प देऊ का तुला
ते मोती देऊ का तुला
तु बोल ना तु सांग ना अग बोल ना
आकाशातील चंद्राच्या डाग शोभतोवरी
बघता त्याला आठवण तुझी येत असे घडीघडी
मी काय सांगु तुला
किती आठवण येत असे मला
तु बोल ना तु सांग ना अग बोल ना
मी काय देऊ तुला? 3
मी केँव्हा म्हटले तुला
चंद्र तारे दे ग
तुझ्या डोळ्यांच
कोमल हातांच
प्रेम तु दे ग. . .
तुझ्या प्रेमाचे स्वप्न
मला दाखविले तु ग
पण माझ्या स्वप्नांचे दिवे
तु विझविले का ग?
त्याच प्रेमाने
माझ्या स्वप्नांना
नजारा दे ग . . नजारा दे ग. . .
कधी दिसे तु चंद्रामधे
कधी दिसे ता-यात
कधी दिसे तु ह्य़ा हातात
कधी मिळे स्वप्नात
निसर्ग नयनात
बघितल्या स्वप्नांना
दिलासा दे ग. . . दिलासा दे ग . . .
Monday, 13 July 2009
नाते हदयाचे नाते
कुणा ठाऊक कुणा नसे
शोधा तर जगामध्ये
शोधा तर स्वर्गामध्ये
तरी नाही मिळणार हे.
नाते -------
मिळतात ज्यांना हे नाते
ते किती खुशनशिब रे
न मिळतात ज्यांना
ते तर तडपता रे
वाटेल मनापासुन
वाटेल हदयापासुन तरी नाही मिळणार हे
नाते
ऋणानुबंधाच्या बंधात असे जखडलेले
मायेच्या कुशीत जणू
प्रेमाने बसलेले
ऋण हे कसे फेडू
जन्म मी किती घेऊ
तरी नाही फिटणार हे
नाते
कवि :- निलेश वासुदेव गणगे
मोब :- 9403252526
Thursday, 7 May 2009
नाम तुझे घेता देवा
नाम तुझे घेता देवा
नाम तुझे घेता देवा दुख माझे दूर जाई
तूच संभाली मजला तूच असे माझी आई !!ध्रु !!
आठवता नाम तुझे संकटही सारे पळे
संशयास स्थान नसे मर्म त्याचे कोणा कळे
शोधु कुठे कुठे तुज सर्व तुच सर्वाठाई !!१!!
जाऊ नये श्वास व्यर्थ नामविन गजानन
चित्त अंतरंगी वळे मंञ राहो मनोमन
तुझ्या चरणाची सेवा मज जन्मोजन्मी देई!!2!!
मन बुध्दी चित्त देह झाले तुझ्यात विलिन
हद्य़ात भेद न राहो अहंकार नमविन
चमत्कार निर्भिड ते उपदेश देत राही !!३!!
नाम तुझे घेता देवा
कवि :- निलेश वासुदेव गणगे
मोब :- ९४०३२५२५२६